Today, we are publishing माझा आवडता संत - तुकाराम निबंध मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay ...
Today, we are publishing माझा आवडता संत - तुकाराम निबंध मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Maza Avadta Sant sant Tukaram Nibandh Marathi) in completing their homework and in competition.
माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी - Maza Avadta Sant sant Tukaram Nibandh Marathi
महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि आणि सर्वात मोठी संत महात्म्यांची परंपरा महाराष्ट्रातच आहे. संतांनी केवळ भगवद्भक्तीच शिकवली असे नाही तर प्रापंचिक माणसाने संसार रथ कसा नेटाने आणि विचारपूर्वक हाकावा हे ही आपल्या विचारमंथनातून कौशल्याने पुढे मांडले.
Related Essay: माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी
संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी आणि इतर वाङ्मयातून सनातन धर्माची आणि अध्यात्माची ओळख सर्वसामान्यांना करून दिली. संतशिरोमणी नामदेवांनी अनेक अभंग रचून भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत फडकवली. संत एकनाथ महाराजांनी महाराष्ट्राला अलौकिक असा अध्यात्ममार्ग शिकविला. त्यानंतर
संतकृपा झाली! इमारत फळा आली।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारले देवालया।
असे म्हणावे लागेल.
संत तुकाराम महाराजांनी त्यावेळच्या प्रतिकल परिस्थितीवर मात करून आपल्या श्रेष्ठ अशा अनेक अभंग रचना करून समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींना भगवद्भक्तीचा मार्ग दाखवला आहे.
मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास । कठिण वज्रास भेदू ऐसे।
भले तर देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
"दुर्जनांशी कठोरता तर सज्जनांशी विनम्रता" हे तुकोबांच्या अभंगांचे वैशिष्ट्य. विठ्ठल भक्तीने रसरसलेले सर्वसामान्यांना जीवनाची अनुभूती देणारे अक्षर वाङ्मय त्यांच्या अभंगातून निर्माण झाले आहे.
लहानपणापासून हरिकीर्तन, भजनाचे फड, पुराणिकांची प्रवचने सतत ऐकल्यामुळे तसेच त्यांची बुद्धी जात्याच सारग्रही असल्याने त्यांच्या अध्यात्म ज्ञानात सतत भर पडत राहिली, मनाने हळवे असलेल्या तुकारामांच्या अंतर्मुख मनाला भक्तीची आणि ईश्वरप्रेमाची वाट दिसली आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सारा संदर्भच बदलून गेला. मूलतःच संवदेनशील मनाचे, अंतर्मुख वृत्तीचे आणि हळवार हृदयाचे असलेले तुकाराम हे प्रतिभावंत होते.
धर्मरक्षणाची जबाबदारी परमेश्वराने संतांवर टाकली, ती तुकोबासारख्या संताने "भक्तीचा गजर" करून प्रभावीपणे पार पाडली. अंधश्रद्धा, अज्ञान आणि कर्मकांडांनी कोंडून ठेवलेली आध्यात्मिक अस्मिता विठ्ठल भक्तीच्या सोज्ज्वळ प्रांगणात मुक्तपणे विहार करू लागली. तुकोबाच्या अभंगवाणीने जागतिक तत्त्ववेत्यांना आणि विचारवंतांना पण वेड लावले आहे. तुकोबारायांच्या साक्षात्कारी अवताराला आता ४०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा अतिशय आनंदयोगी योग आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम यांचा जीवनोपदेश "बहुजन हिताय बहुजन सुखाय' असाच आहे. संत तुकारामांची साधना, त्यांची नवविधा भक्ती, त्यांचा प्रापंचिक उपदेश आणि दांभिकांना त्यांनी दिलेली चपराक, अशा तुकारामांच्या विविध पैलूंचा अभ्यास आजही होणे आवश्यक आहे.
भागवत धर्माची पताका महाराष्ट्रात उंच फडकावत ठेवणाऱ्या तुकारामांना साऱ्या वैष्णवांच्या मांदियाळीत "तुका झालासे कळस' असे स्थान प्राप्त झाले आणि म्हणूनच ते संतसूर्य ठरले.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS