Today, we are publishing माझा आवडता संत-संत ज्ञानेश्वर मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (...
Today, we are publishing माझा आवडता संत-संत ज्ञानेश्वर मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (maza avadta sant dnyaneshwar marathi nibandh) in completing their homework and in competition.
माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी - Maza Avadta Sant Dnyaneshwar Marathi Nibandh
फार प्राचीन काळापासून आपला देश हा संतांचा, तत्त्वज्ञांचा आणि ऋषींचा म्हणून ओळखला जातो आणि आध्यात्मिकता हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. संतांनी आपल्या शिकवणुकीद्वारे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता आणि सर्वसाधारण राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण केली. या संत परंपरेतील श्री ज्ञानेश्वर हे एक महान संत होत. ज्ञानेश्वर म्हणजे संत शिरोमणी।
संतकृपा झाली। इमारत फळा आली।
ज्ञानदेवे रचिला पाया ! उभारले देवालया।।
असं म्हणूनच म्हणतात.
संत ज्ञानेश्वरांमध्ये मानवतावादी संत, तत्त्वज्ञ, साक्षात्कारी कवी आणि महान समाजसुधारक असे अनेक गुण एकवटलेले आहेत. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवरील महान टीका ज्ञानेश्वरी लिहिली. हे त्याचं लोकप्रिय कार्य सर्वसामान्य माणसांची मनं काबीज करणारं ठरलं. आज ७०० वर्षानंतरही ज्ञानेश्वरीची जनमानसातील ओढ कमी झाली नाही तर उलटपक्षी ती दिवसेदिवस वाढतच आहे. केवळ १६ वर्षाच्या मुलानं भगवद्गीतेसारख्या ग्रंथावर स्वतंत्र विचार, सघन आशय, आविष्कारांची नितळता, ओघवती शैली या गुणांनी युक्त सुंदर साहित्य निर्मिती केली, हे मानवी मनाच्या आकलनाच्या पलीकडे आहे.
ज्ञानेश्वर हे प्रेम आणि करुणा यांची प्रतिमा होते. बालवयात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समाजाचा छळ आणि अवहेलना सोसावी लागली. पण त्याबद्दल त्यांच्या मनात यत्किंचितही कटुता नव्हती. उलट सर्वांबद्दल प्रेम व करुणाच त्यांनी बाळगली. त्यांनी आपलं अल्पायुष्य सर्वसामान्य लोकांना प्रेम व विश्वबंधुत्वाची शिकवण देण्यातच समर्पित केलं. स्वभाषेचा इतका उच्चकोटीचा अभिमान इतर कुठल्याही ग्रंथात नसेल. स्वतःच्या दुःखाचा पुसटसाही उल्लेख ज्ञानेश्वरीत, अमृतानुभवात किंवा चांगदेवपासष्टीत आदळत नाही. उलट अखिल जगतासाठीच ते भगवंताजवळ 'पसायदान' मागतात. पसायदान म्हणजे मानवतेला पडलेलं एक महन्मंगल स्वप्नच!
संत ज्ञानेश्वराचं आयुष्य तसं पाहिलं तर अगदी अल्प. त्यांनी केवळ वयाच्या २२व्या वर्षी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या आयुष्यात बुद्धिमत्ता, नीतिमत्ता आणि धार्मिक परंपरेचा असा प्रभाव निर्माण केला की गेली ७ शतके अगणित लोकांना तो आध्यात्मिक प्रेरणा देत आहे. तुम्ही, आम्ही आज 'म-हाटी' लिहितो, ते केवळ ज्ञानेश्वरांनी फुलवलेल्या स्वभाषाभिमानाच्या अंगाऱ्यामुळेच! संत ज्ञानेश्वर हा मराठी मनाला शाश्वत मार्गदर्शन करणारा ज्ञानदीपच आहे.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
mast aahe sant dyneshwarani pahile tar agdi baharun jatil
ReplyDelete