Maza Avadta Chand Essay in Marathi - माझा आवडता छंद मराठी निबंध छंद म्हणजे आवड. रोजची ठरावीक कामे करणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे या चाकोर...
Maza Avadta Chand Essay in Marathi - माझा आवडता छंद मराठी निबंध
छंद म्हणजे आवड. रोजची ठरावीक कामे करणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे या चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडे जाऊन आपल्या आवडीची एखादी गोष्ट करणे म्हणजे छंद जोपासणे होय. हे छंद आपल्याला रोजच्या नीरस कंटाळवाण्या जीवनात आनंदाचे क्षण देतात. जणू आपल्या जीवनातील 'ओअॅसिस' असतात ते!
अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात. पोस्टाची तिकिटे जमवणे, जुनी नाणी गोळा करणे, ग्रीटिंग कार्डस् जमवणे असे अनेक छंद आपण पाहत असतो. पण माझा छंद आहे वर्तमानपत्रातील क्रिकेटवीरांची कात्रणे जमविण्याचा निरनिराळ्या क्रिकेटच्या मॅचेस चालू असताना, त्या त्या वेळी येणारे क्रिकेटवीरांचे फोटो, माहितीचे येणारे निरनिराळे तक्ते यांची कात्रणे काढून मी माझ्या फाइलमध्ये जमवून ठेवतो. मग त्यांचे देशानुसार अथवा निरनिराळ्या स्पर्धांच्या अनुसार वर्गीकरण करून निरनिराळ्या कात्रणवहीत चिकटवून ठेवतो. या माझ्या वह्या म्हणजे माझा आनंदाचा खजिना आहे.
Read One More Essay Here : माझा आवडता छंद
या माझ्या छंदामुळे माझ्या माहितीत भरही पडत असते. कोणी किती धावा काढल्या, कोणी कोणते विश्व-विक्रम केले आहेत, कोणी सर्वात जास्त झेल घेतले आहेत, सर्वात जास्त विकेटस् कोणी घेतल्या आहेत, कोण सर्वोत्तम फलंदाज मानला जातो अशा विविध गोष्टींची माहिती होऊन माझे सामान्यज्ञान सतत वाढत राहते.
आमच्या घरी कोणी पाहुणे आले असता, त्यांना मी या माझ्या वह्या दाखवतो. त्यांना माझे खूप कौतुक वाटते. शाळेतही कोणी पाहुणे शाळा पाहायला येतात, संमेलनाच्या वेळी येतात, त्यांना माझ्या वह्या दाखवून मी शाबासकी मिळवतो. आमच्या सोसायटीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने भरलेल्या प्रदर्शनात मी या वह्या ठेवल्या आणि सर्वांची वाहवा मिळवली.
असा हा माझा छंद माझ्या जीवनातील विरंगुळा आहे. कधी मी आजारी असलो, खेळायला जाऊ शकत नसलो तर या माझ्या वह्या मी बाउत बसतो. भग मला जुन्या गोष्टी आठवतात, या छंदामुळे झालेले माझे कौतुक आठवते अन् थोडा वेळ माझा आजार दूर पळून जातो. विहिरी, ओढे या ठिकाणी पाणी दूषित होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कारखान्यातील दूषित पाणी नदीमध्ये सोडता कामा नये.
Related Essay : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध
शहरामध्ये ध्वनिप्रदूषण सर्वात जास्त असते. सतत होणाऱ्या लोकसंख्या वाढीमुळे अधिक उत्पादनाची आवश्यकता असते. त्यासाठी अधिक कारखाने निर्माण होतात. त्यामुळे अधिक प्रदूषण होते. असे हे दुष्टचक्र चालूच राहते. हे प्रदूषण थांबवणे हे आपले नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे जेव्हा साधेल, तेव्हाच आपले जगणे सुसह्य, आनंदमय होईल.
COMMENTS