Today, we are publishing माझा आवडता ऋतू : वर्षा ऋतू मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use these Long an...
Today, we are publishing माझा आवडता ऋतू : वर्षा ऋतू मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use these Long and Short Maza Avadata Ritu Varsha Ritu Nibandh (Essay) in Marathi in completing their homework and in competition.
या गाण्याच्या ओळी आठवतात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर हे सहा ऋतू... प्रत्येक ऋतूंचे वेगवेगळे असे वैशिष्ट्य आहे. मला आवडतो तो मात्र वर्षा ऋतू... म्हणजेच पावसाळा...
ग्रीष्म ऋतूत तापलेली धरणी, वैराण झालेला निसर्ग, तहानलेली सृष्टी पावसाच्या धारांनी शांतावून जाते. आठवडाभरात सगळी सृष्टी हिरवीगार होते. तापलेल्या पृथ्वीवर पडलेल्या पावसाच्या धारांमुळे पसरलेला मातीचा सुवास, जणू काही ग्रीष्माचा सारा ताप वर्षा ऋतू शोषून घेतो. पावसाच्या धारांनी कोण आनंदित होत नाही ! सर्वात जास्त आनंद होतो तो आपला, जो साऱ्या जगाचा पोशिंदा... शेतकऱ्याला. पेरणीची लगबग उडते. शेतजमिनी अंकुरू लागतात. उजाड जंगल नव्या पालवीनं नटू लागतं. पायवाटा रानफुलांचा साज लेवून डोलू लागतात. वाऱ्यावर दरवळणारा रानफुलांचा वास वातावरण प्रफुल्लित करतो. एक आगळं वेगळं चैतन्य मनाला देऊन जातो. हा वर्षा ऋतू एक अनोखा ताजेपणा, साऱ्या सृष्टीला बहाल करतो.
आपल्या जलधारांच्या हातांनी सृष्टीला स्पर्श करतो आणि सृष्टीचं रूपच पालटून जातं. हिरव्यागार गवताची मखमल साऱ्या धरतीवर उलगडते. मोठमोठ्या वृक्षांना बिलगलेल्या वेली हिरव्यागार होतात. डोंगर कड्यांवरून पावसाचं पाणी खळाळत ओढे, झरे बनून नदीकडे धाव घेतात आणि मग आपण वर्षा सहली काढून डोंगरकड्यावरून कोसळणारे धबधबे "याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी धाव घेतो.
सुरुवातीचा पाऊस सुखावतो. मात्र जेव्हा संततधार कोसळतो तेव्हा मात्र चिडचिड होते. चिखल... पाण्याची डबकी... नको नको होऊन जातं. हाच पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा मात्र नदीला पूर येतो. हाच जलप्रपात अनेक संसार आपल्याबरोबर घेऊन जातो. अनेकांचे संसार, काही वेळा काही जीवही त्यात वाहून जातात. पण हे क्वचितच !
एरवी मात्र हा वर्षा ऋतू जीवनदायी आणि म्हणूनच आनंददायी आहे.
Long and Short Maza Avadata Ritu Varsha Ritu Nibandh
Below, Two Diferent Essays on My favourite season Rainy Season in Marathi Language are given. Students can choose the essay according to their need.Maza Avadata Ritu Varsha Ritu Nibandh Marathi (250 words)
पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून ऋतूंची निर्मिती होते हा साधा सरळ भौगोलिक नियम... पण पृथ्वीवर होणारे हे ऋतू... आणि त्यांचे वेगवेगळे रंग... अक्षरश: - “सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...”या गाण्याच्या ओळी आठवतात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर हे सहा ऋतू... प्रत्येक ऋतूंचे वेगवेगळे असे वैशिष्ट्य आहे. मला आवडतो तो मात्र वर्षा ऋतू... म्हणजेच पावसाळा...
ग्रीष्म ऋतूत तापलेली धरणी, वैराण झालेला निसर्ग, तहानलेली सृष्टी पावसाच्या धारांनी शांतावून जाते. आठवडाभरात सगळी सृष्टी हिरवीगार होते. तापलेल्या पृथ्वीवर पडलेल्या पावसाच्या धारांमुळे पसरलेला मातीचा सुवास, जणू काही ग्रीष्माचा सारा ताप वर्षा ऋतू शोषून घेतो. पावसाच्या धारांनी कोण आनंदित होत नाही ! सर्वात जास्त आनंद होतो तो आपला, जो साऱ्या जगाचा पोशिंदा... शेतकऱ्याला. पेरणीची लगबग उडते. शेतजमिनी अंकुरू लागतात. उजाड जंगल नव्या पालवीनं नटू लागतं. पायवाटा रानफुलांचा साज लेवून डोलू लागतात. वाऱ्यावर दरवळणारा रानफुलांचा वास वातावरण प्रफुल्लित करतो. एक आगळं वेगळं चैतन्य मनाला देऊन जातो. हा वर्षा ऋतू एक अनोखा ताजेपणा, साऱ्या सृष्टीला बहाल करतो.
आपल्या जलधारांच्या हातांनी सृष्टीला स्पर्श करतो आणि सृष्टीचं रूपच पालटून जातं. हिरव्यागार गवताची मखमल साऱ्या धरतीवर उलगडते. मोठमोठ्या वृक्षांना बिलगलेल्या वेली हिरव्यागार होतात. डोंगर कड्यांवरून पावसाचं पाणी खळाळत ओढे, झरे बनून नदीकडे धाव घेतात आणि मग आपण वर्षा सहली काढून डोंगरकड्यावरून कोसळणारे धबधबे "याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी धाव घेतो.
सुरुवातीचा पाऊस सुखावतो. मात्र जेव्हा संततधार कोसळतो तेव्हा मात्र चिडचिड होते. चिखल... पाण्याची डबकी... नको नको होऊन जातं. हाच पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा मात्र नदीला पूर येतो. हाच जलप्रपात अनेक संसार आपल्याबरोबर घेऊन जातो. अनेकांचे संसार, काही वेळा काही जीवही त्यात वाहून जातात. पण हे क्वचितच !
एरवी मात्र हा वर्षा ऋतू जीवनदायी आणि म्हणूनच आनंददायी आहे.
Maza Avadata Ritu Varsha Ritu Nibandh Marathi (300 Words)
“ गिरीशिखरावरूनी सोगे सुटले ढगांचे,
ओले हिरवे दिवस येती जाती श्रावणाचे! "
ग्रीष्माच्या तडाख्याने होरपळून गेलेल्या तप्त सृष्टीला वर्षाऋतू थंडावा आणि शीतलता प्राप्त करून देतो. मनाला ओलावा प्राप्त करून देणारा वर्षाऋतू सर्वांचाच लाडका आहे. वर्षाऋतूत येणारा श्रावण येताना आपल्याबरोबर सगळ्या सणांना घेऊन येतो. पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण, श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा .... श्रावण म्हणजे सणांची नुसती रेलचेल! माणसे उत्साहाच्या आणि आनंदाच्या जलधारांनी चिंब भिजतात, तर पर्जन्यधारांमुळे सृष्टीचा अद्भुत कायापालट होतो. नेहमी भकास वाटणारे डोंगर हिरव्या पाचूप्रमाणे चमकू लागतात. सारी सृष्टी जणू हिरव्या शालूचा भरजरी साज परिधान करते. काळ्या मातीमधून नाजूकसे, इवलेसे हिरवे कोंब डोकावू लागतात.
मेघगर्जनांच्या तोफा कडाडतात, चपळ विजेचे लयबद्ध नृत्य सुरू होते आणि वर्षाराणीचे आगमन होते. मोर अत्यानंदाने डोलू लागतात. पावसाची आतुरतेने वाट बघणारा चातक सुखावतो. लहान मुलांचा आनंद गगनात मावत नाही. 'येरे येरे पावसा' असे गीत गात बाळगोपाळ खळाळत्या पाण्यात कागदी होड्या सोडतात. साऱ्या सजीव सृष्टीत चैतन्याचे वारे सळसळू लागते. रस्त्यारस्त्यांवर रेनकोट, छत्रीची दाटी होते. हवाहवासा वाटणारा मातीचा कस्तुरी सुगंध नाकात भरून राहतो. ऊनपावसाच्या पाठशिवणीच्या या रंगतदार खेळात अवचित दर्शन देणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य साऱ्यांचे मन आकषून घेते. 'हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे' असे मनोहर दृश्य सर्वत्र दिसू लागते.
छत्री जवळ असली की पाठ फिरवणारा आणि छत्री नसेल तेव्हा हमखास आपली फजिती करणारा हा 'लहरी' पाऊस शहरवासीयांप्रमाणेच गावातील शेतकऱ्यांनाही प्रिय असतो; कारण पावसाच्या कृपादृष्टीमुळेच शेतात हिरवेगार पीक डोलू लागते आणि शेतकऱ्याला स्वर्ग दोन बोटे उरतो. वर्षाराणीने कृपा केली की सगळेजण आनंदधारांनी न्हाऊन निघतात.... पण जर वर्षाराणीने पाठ फिरवली तर? तर मात्र सर्वांच्या तोंडचे पाणी पळते. पावसाअभावी शेती नाही, अन्न नाही आणि पाणीही नाही अशी अवस्था येते. कधी ‘पाण्यासाठी दाही दिशा, आम्हा फिरवीशी जगदिशा' असा बिकट प्रसंग ओढवतो, तर कधी अतिवृष्टीमुळे नदीला पूर येतो; अपरिमित मनुष्यहानी, वित्तहानी होते. वर्षाराणीचीच ही दोन रूपे आहेत, अतिवृष्टी व अनावृष्टी!
वर्षाराणीकडे प्रलयंकार करण्याची अचाट ताकद आहे, तसेच मृतवत् तप्त धरित्रीला आपल्या अमृतमय जलधारांनी शांत करण्याची किमयाही आहे. निसर्गाचे चित्र विविध रंगांनी खुलविणारा वर्षाऋतू हा एक जादुगारच आहे! पर्जन्यराज हा ऋतुचक्रातील 'अनभिषिक्त सम्राट' आहे. अशा या वर्षाऋतूत जेव्हा जलधारा कोसळू लागतात, झाडे-वेली, पक्षी, रस्ते न्हाऊन निघतात, त्यावेळी मन अत्यानंदाने गाऊ लागले,
" आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ।This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
किती चातक चोचीने, प्यावा वर्षाऋतू तरी ॥"
COMMENTS