In this article, we are providing Nibandh on Majhi Aaji in Marathi language for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can rea...
In this article, we are providing Nibandh on Majhi Aaji in Marathi language for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read माझी आजी निबंध मराठी मधून and use in completing theit homework. If you guys want more marathi essays, then you can our other essays.
माझी आजी निबंध मराठी मधून - Majhi Aaji Nibandh Marathi
'नातू म्हणजे काय, दुधावरची साय' असे म्हणत प्रेमळ हात फिरवून रोज सकाळी मला उठवते ती माझी आजीच. आई-बाबांना वाटतं, मी लवकर उठावं, सारं आटोपून अभ्यासाला बसावं परंतु आजी सांगते त्यांना, अरे बाबा, पोर लहान आहे तोवर झोपू दे. उद्या अभ्यास वाढला की उठेलच आपोआप.'
Related Essay : माझी आई निबंध मराठी
आमच्या घरात सारेच आजीचा शब्द मानतात. ती साऱ्यांवरच माया करते. प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ खावयास करते. सकाळी आईला खप मदत करते मग दुपारी जप, पोथी वाचन करते. संध्याकाळी तिची माझी जोडी. आम्ही दोघे तळ्याकाठी जाऊन बसतो. येताना देवदर्शन घेवून भाजी घेवून घरी परततो. कधी मला जमलं नाही तर आजी एकटीच फिरून येते. 'आता या वयाला चालण्याचा थोडा तरी व्यायाम हवा.' असं तिचं मत. तिचा आहार व वेळा अगदी ठरलेल्या. जरा त्यात कमी जास्त किंवा बदल चालत नाही.'
Related Essay : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
घरातील वस्तू जागच्या जागी असाव्यात याकडे तिचे लक्ष असते. रोज माझ्या गोष्टींचा हट्ट मात्र ती पुरवते. माझं सारं पाठांतर- पाढे, मनाचे श्लोक, गीतेचा अध्याय, कविता तीच करून घेते. शेजारी कुणी सोबतीसाठी किंवा एखादा पदार्थ करण्यासाठी बोलावले की ती उत्साहाने जाते. ताईला तर ती नेहमीच काही ना काही शिकवत असते. आमच्या वाडीत ती साऱ्यांनाच हवीहवीशी वाटते. या वयातही तिचं काम करणं, उत्साह साऱ्यांना लाजवणारा आहे.
Related Essay : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
वाटतं, देवानं आजीला खूप खूप आयुष्य द्यावे. आणि तिच्या सावलीत मी फुलावं.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS