In this article, we are providing Nibandh on My Mother in Marathi language for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read...
In this article, we are providing Nibandh on My Mother in Marathi language for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read माझी आई निबंध मराठी and use in completing theit homework. If you guys want more marathi essays, then you can our other essays.
माझी आई निबंध मराठी - Majhi Aai Marathi Nibandh Lekhan
बाईंचा मराठीचा तास अगदी रंगात आला होता. साने गुरूजींच्या 'श्यामच्या आई' चे वर्णन करण्यात बाईही रंगून गेल्या होत्या. माझ्या डोळ्यासमोर मात्र माझीच आई दिसू लागली.
Related Essay : माझी आजी निबंध मराठी मधून
माझी आई रंगाने सावळी पण खूपच तरतरीत. तिचा चेहरा नेहमी आनंदीत असतो. चालताना तिचा लांबसडेक केसांचा शेपटा तिच्या डौलदार बांध्यात भरच घालतो. आवाज गोड पण बोलणं माफक. नीटनेटकेपणामुळे ती नेहमीच सर्वात उठून दिसते.
Related Essay : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
मी तिचा तसा खूप लाडका परंतु जरा चुकलो की ती शिक्षा करते. फटके वा चटके न देता अबोला धरते व भरपूर अभ्यासाची शिक्षा फरमावते. माझी शाळा, अभ्यास,स्वच्छ पोशाख, वागणं-बोलण यांवर तिच्या शिस्तीचा पहारा असतो. शाळेच्या सर्व स्पर्धात मी सहभागी व्हावे, बक्षिसे मिळवावीत म्हणून तीही खूप प्रयत्न करते. माझ्या वाढदिवसाला तर मित्रांना बोलावून छान छान पदार्थ करून खायला घालते.
Related Essay : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
'बोलताना हळू बोलावं, समोरच्याचा मान राखावा.' अशा साध्या, सूचक वाक्यांमधून ती मला घडवते. चुकलो की विविध गोष्टी सांगून चूक दाखवून देते. आजी आजोबांच्या आवडी-निवडी, त्यांच आजारपण यांकडे ती जातीने लक्ष देते म्हणून ती त्यांचीही लाडकी आहे. 'दक्ष पालक' म्हणून माझ्या आईलाही जेव्हा बक्षिस मिळाले तेव्हा तर माझा अभिमान अधिकच वाढला. माझे तर ती खरोखरच दैवतच आहे.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS