Today, we are publishing कवी शब्दसृष्टीचे ईश्वर मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (कवी शब्...
Today, we are publishing कवी शब्दसृष्टीचे ईश्वर मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (कवी शब्दसृष्टीचे ईश्वर) in completing their homework and in competition.
कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध
"जो न देखे रवि सो देखे कवी।"
या एकाच ओळीत कवीचे मोठेपण सामावले आहे. कवीला लाभलेली प्रतिभा ही एक अलौकिक शक्ती आहे. तो कवीचा तृतीय नेत्र आहे . या प्रतिभेच्या शक्ती-सामर्थ्याने तो भूत, भविष्यात डोकावून पाहतो. स्वर्ग-पाताळातील सृष्टी शब्दरूपाने साकार करू शकतो.
कारण दिक्कालातून आरपार पाहण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झालेले असते. या कामी त्याला मदत करत शब्द. सार्थक, उचित, समर्पक शब्द. शब्दांचे सामर्थ्य फार मोठे असते. शब्द ब्रह्ममय असतात. ते अमर असतात.
मना-मनातील स्थूल, सूक्ष्म भाव-भावनांना कल्पनेचा साज चढवून अर्थवाही शब्दातून त्या प्रकट करण्याची किमया फक्त कवीच करू शकतो. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अशाच दिव्य कल्पनाशक्तीचा विलास आहे.
"चलां कल्पतरूचे आरव,
चेतना चिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव पियूषाचे,
चंद्रमे जे अलांछन,
मार्तंड जे तापहीन." हे सज्जनांचे ज्ञानेश्वरांनी केलेले वर्णन उत्कृष्ट रूपक अलंकाराचे उदाहरण आहे. शब्दांचा मुक्त विलास आहे. ज्ञानेश्वर नावाप्रमाणेच ज्ञानाचे, शब्द सृष्टीचे ईश्वर होते.
एकनाथांनी वज्राची अक्षरे करून मराठी भाषेला समृद्ध केले. “औषध नलगे मजला' किंवा “शंकरास पूजिले सुमनाने" यासारख्या श्लेष अलंकारातून कवीने केलेली कोirl योजना व त्यातून निर्माण झालेली अर्थाची चमत्कृती कवीच्या शब्द सामर्थ्याची साक्ष देतात.
कवीच्या नाद-मधुर शब्दसृष्टीत मानवी मन न्हाऊन निघते, तर कधी क्रांतीच्या जयजयकाराने पेटून उठते. जे काम तलवार करू शकत नाही ते काम शब्द करू शकतात.
रत्नावलीच्या शब्दांच्या फटकाऱ्याने लंपट तुलसीदास खजील झाले, त्यांच्या मनाचे परिवर्तन झाले, संसाराविषयी अनासक्त बनले आणि पुढे संत तुलसीदास म्हणून प्रसिद्धीस पावले.
'राम' नामाच्या दोन अक्षरी शब्दाने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला.
आधुनिक मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या अशिक्षित कवयित्री बहिणाबाई चौधरी शब्दसृष्टीच्या निर्मात्या आहेत. मन म्हणजे एक अमूर्त, गूढ, अदृश्य वस्तू. पण तिचे किती समर्पक वर्णन त्यांनी केले आहे. त्याकरिता त्यांना साथ दिली ती अर्थवाही समर्पक शब्दांनीच.
'मन एवढं-एवढं जसा खाकसाचा दाणा
मन केवढं-केवढं त्यात आभाळ माइना।'
किंवा 'मन जहरी-जहरी त्याच न्यारं रे तंतर,
अरे चू-साप बरं त्याले उतारे मंतर।'
यातून मनाचे यथार्थ वर्णन केले आहे.
कुरुक्षेत्रावर भगवत्गीता सांगून अर्जुनाला मोहाच्या पाशातून बाहेर काढणारे भगवान श्रीकृष्ण, रामायण, महाभारत लिहिणारे वाल्मिकी, व्यास हे ऋषी खऱ्या अर्थाने शब्दसृष्टीचे ईश्वर होते. आधुनिक युगात सृष्टीचे सुंदर, मनमोहक वर्णन करणारे बालकवी काय किंवा 'मृत्यू' ला ही 'हरिदूत' संबोधून मरणगीत लिहिणारे भा. रा. तांबे काय ? तसेच आम्ही कोण ?' मधून कवी आणि कलावंतांची महती अभिमानाने वर्णन करणारे 'केशवसुत' हे सर्वच शब्दसृष्टीचे ईश्वर होत. अखिल विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाइतकेच ते महान आहेत.
COMMENTS