In this article, we are providing जंगलातील एक दिवस निबंध मराठी माहिती for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read जंगल...
In this article, we are providing जंगलातील एक दिवस निबंध मराठी माहिती for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read जंगलातील एक दिवस निबंध मराठी and use in completing theit homework. If you guys want more marathi essays, then you can our other essays.
जंगलातील एक दिवस निबंध मराठी माहिती
सहामाही परीक्षा संपली आणि घरी आल्याबरोबर आईने आनंदाची बातमी दिली की आपल्याला दिवाळी झाल्यावर नागपूरला काकांकडे जायचे आहे. आणि एवढेच नाही तर तेथे गेल्यावर आपण सर्वजण कान्हा किसलीला जंगलात रहायला जाणार आहोत. मला तर त्या रात्रीपासूनच जंगलाची, दायाची स्वप्ने पडायला लागली.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच आम्ही गाडीने नागपूरला गेलो. तेथे सचिन, कपील, अमित राधाबरोबर दिवाळीचे उरलेले दोन दिवस खूप मज्जा केली. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कान्हाला जाणार होतो. काका, आत्या, आजी-आजोबा सर्वजण बरोबर होते. काकांनी प्रवासासाठी मिनी बस बुक केली होती. वाटेत थांबत, मजा करत आमचा प्रवास सुरु होता. एकदा तर नदी पार करतांना आमच्या बसचे टायर गाळात रुतले, मग काय, मोठ्या माणसांच्या रागावण्याला धुप न घालता आम्ही पाण्यातही खुप मजा केली. त्या दिवशी आम्ही गोंदियाला मुक्काम केला व दुस-या दिवशी कान्हयाला पोहोचलो.
Related Article : अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन
मध्यप्रदेशातील कान्हा-किसलीचे जंगल हे वन्यप्रेमींसाठी फार महत्त्वाचे ठिकाण आहे. कान्हयाचे अभयारण्य म्हणजे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचे माहेरघर. पट्टेरी वाघ हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य. व्याघ्र प्रकल्पामुळे सध्या या अभयारण्यात १२५ हुन अधिक वाघ आहेत. येथील सदाहरीत जंगलात उंचच उंचं साल वृक्ष आहेत. त्याचबरोबर बांबूची बने, विस्तीर्ण गवताळ प्रदेश आणि धनदाट सावली हेही या अभयारण्याचे वैशिष्टय आहे. वाघ, बिबट्या, मोर, हरणं, सांबर, बारसिंगा, गवे, अस्वल, सनकुने, कोल्हे, माकडं या प्राण्यांबरोबरच असंख्य रंगीबेरंगी वेगवेगळे पक्षी येथे आपल्याला बघायला मिळतात. ही सर्व माहिती आम्हाला बाबांनी तिथे पोचण्यापूर्वीच सांगितली होती.
Related Article : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
कान्हयाच्या जंगलात आपल्याला पायी चालण्यास मनाई आहे. त्यामुळे जीपमधून आम्ही जंगलसफारीवर निघालो. आमच्याबरोबर वनखात्याचा एक गार्ड बंदूक घेऊन निघाला. नुकताच द्यावसाळा होऊन गेला होता. त्यामुळे जंगलातील पाने स्वच्छ धुऊन निघाली होती. खूप गच्च झाडीतून आमची जीप चालली होती. अन अचानक समोरून एक गला बाजूच्या झाडीत गेला, केवढा अजस्त्र गवा होता तो. त्याने एक धडक दिली असती तर आमची जीप होती की नव्हती झाली असती. बाबा व्हिडीओ कॅमेन्याने सर्व शूट करत होते. इतका वेळ चालू असलेली आमची पोपटपंची गव्याच्या नुसत्या ओझरत्या दर्शनाने बंद झाली, जीपच्या डावी-उजवीकडे अनेक प्राणी आम्हाला दिसत होते.. मोठी-मोठी माकड़े झाडांवर माकडचेष्टा करत होती. अनेक प्राण्यांची तर आम्हाला नावेही माहीत नव्हती. परंत आमच्याबरोबर असलेला गार्ड देवीसिंग याला मात्र या जंगलाची. प्राण्यांची खडानखडा माहिती होती. तो आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होता.
Related Article : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध
हरणं, बारशिंगे, भेकरं कळपाकळपाने परत फिरत होती, मधेच पावसाची एक सर आली, आणि पुढच्याच वळणावर एक अवर्णनीय दृश्य दिसले, मोर आपला पूर्ण पिसारा फुलवून नाचत होता.
"थुईथुई नाच माझ्या अंगणात मोरा, निळ्या निळ्या पिसांचा हा फुल फुलोरा" ही लहानपणी वाचलेली कविला नकळतपणे ओठावर आली. जीएने आम्ही पुढे पुढे जात होतो. पण अजून जंगलचा राजा आमच्यावर प्रसन्न झाला नव्हता. मध्येच एका वळणावर अचानक माकडं झाडाच्या शेंड्यावर जायला लागली, हरणं, भेकरे, बारशिंगे उलट्या दिशेने पळायला लागली. झाडांच्या शेंड्यांवर असलेले पक्षी वेगवेगळे आवाज करीत होते. देवीसिंग म्हणाला की या भागात जवळपास कुठेतरी वाघ आला असावा. पण खूप वेळ थांबूनही वाघ आम्हाला दिसला नाही. आता पोटातही कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे आम्ही परत फिरलो.
Related Article : माझा आवडता छंद मराठी निबंध
दुपारी जेवण झाल्यावर पुन्हा आम्ही जंगलात फिरायला बाहेर पडलो. पण या खेपेला जीपच्या ऐवजी हत्तीवरून निघालो. हत्तीच्या पाठीवर लाकडी हौदा होता. त्यात आम्ही बसलो. हत्तीचा माहूत आणि एक गार्ड आमच्याबरोबर होता. आता अगदी उघड्या जंगलातून आमचा प्रवास चालू होता. झाडांतून जाताना आपल्याला फांदी लागू नये म्हणून सगळे प्राण डोळ्यात आणून लक्ष ठेवावे लागत होते. मधेच हत्तीच्या माहताला वाघाची विष्ठा दिसली. यानंतर वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. आणि बाध दिसण्याची आशा पुन्हा पलवीत झाली, वाघाच्या पावलांचा माग काढीत, माहताच्या इशान्यानुसार हत्ती सुसाट पळत होता. आपण हत्तीच्या पाठीवरून खाली पडू की काय अशी नवीच भीती वाटू लागली. आणि थोड्याच वेळात दूर गवतात आराम करीत असलेला जंगलचा राजा दिसू लागला. त्याच्यासमोर हत्ती उभा ठाकला. वाघ आणि इत्ती दोघेही तल्यबळ, एकमेकांचा अंदाज घेत, एकमेकांवर गरकावत होते. तोपर्यंत आमच्या माहताने वॉकीटॉकीवरून वाघ दिसल्याची बातमी सगळीकडे कळवली होती. त्यामुळे आमच्यासारखेच अनेक प्रवासी वाघाला बघण्याच्या सोहळ्यात सामील होणार होते. दुसरे प्रवासी येईपर्यंत आमचा हत्ती वाघाच्या समोरच राहणार होता.
Related Article : जागतिक पर्यावरण दिवस निबंध
आता बाबांचे फोटो सेशन जोरात चालू होते. वाघाचा जबडा उघडलेला फोटो मिळावा म्हणून प्रयत्न सुरू होते. हत्तीनेही आपल्या सभोवतालचे गवत साफ करणे सुरू केले होते. तेथे वाघ होता म्हणून इतर प्राणी गायब झाले होते. थोड्या वेळाने इतर हत्तीवरून खूप प्रवासी आले आणि आमचा हट्सच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा गप्पांचा फड जमला. आजोबा त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते. आमचे फणसूचे घर अगदी जंगलातच आहे. तेथेही कधीमधी वाघ येऊन एखादे वासरू रात्री पळवून नेत असे. त्या गोष्टीतला वाघ मी आज खराखुरा पाहिला. ते गवे, हरणं, भेकर, बाशिंगे, माकड़, वेगवेगळे पक्षी माझ्या डोळ्यांतुन मनात घर करून बसले. कान्ह्याच्या जंगलातला तो दिवस मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS