Today, we are publishing आम्ही एकादशी साजरी कर तो मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this article ( Ek...
Today, we are publishing आम्ही एकादशी साजरी करतो मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this article (Ekadashi Essay in Marathi) in completing their homework and in competition.
आम्ही एकादशी साजरी करतो मराठी निबंध
हिंदू धर्मात पाप आणि पुण्य यासंबंधी काही निश्चित रूढ कल्पना आहेत. दया, सत्य, परोपकार तसेच नामस्मरण, यथासांग देवपूजा यांतून पुण्यलाभ होतो तसेच उपवास केल्यानेही पुण्य प्राप्त होते अशी कल्पना आहे.
घरात आजी-आजोबांची एकादशी असायची. म्हणजे आमची मजा असायची. आमच्या दृष्टीने तो पर्वणीचा काळच असायचा. खिचडी, भगर, दाण्याची आमटी हा मेनू !! मग काय विचारता! अस्मादिक अगदी खूष!! आमची आजी दिलदार होती ! नातवांच्या हातावर ठेवल्याशिवाय काही खायचे म्हणजे आपण फार मोठे पाप करतोय अशी त्या बिचारीची भाबडी भावना असे. म्हणून एकादशीचे हे पदार्थ चवीसाठी का होईना बशीभर आमच्या पुढ्यात ठेवले जात !!
आज आषाढी एकादशी आहे आणि सर्वांनीच उपवास करायचा आहे. उगीच चिवडा, बिस्किटे खाऊ नका अशी घोषणा आईने सकाळी उठल्यावर केली !
नुसताच चहा कसा प्यायचा म्हणून आदल्यादिवशी आईने दाणे घालून बटाट्याचा खमंग चिवडा करून ठेवला होता. तो कुरकुरीत उपवासाचा चिवडा मनसोक्त खात पहिला चहा प्राशनाचा कार्यक्रम तर उरकला ! नंतर जरा वेळ गेल्यावर केळी, उकडलेली रताळी आणि तत्सम पिष्टमय पदार्थांचे सामुदायिक सेवन झाले.
दुपारी आम्ही सर्व फराळाला बसलो. साखरेत घोळलेले, तळलेले रताळ्याचे काप किती खाल्ले देव जाणे ! बटाट्याची उपवासाची भाजी हा तर अगदी खास आवडीचा पदार्थ ! खिचडी, भगर व दाण्याची आमटी हे प्रमुख पदार्थ तर होतेच; पण राजगिऱ्याचे लाडू दुधात बुडवून खाताना काही वेगळाच आनंद होत होता.
उपवासासाठी म्हणून आईने खास फ्रूटसॅलड तयार केले होते. त्यात आईस्क्रीम घातले होते. आईने श्रमपूर्वक केलेल्या या खास पदार्थावर अन्याय करणे बरोबर नाही हे लक्षात घेऊन पाच/सहा वाट्या हे पक्वान्न पोटात रिचवले. फळे पचायला हलकी असतात आणि आई तू हा पदार्थ फारच छान केला आहेस अशी आईची स्तुती करीत त्यावर मी अक्षरश: तुटून पडलो !
विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ खाल्ले जात होते. साबुदाणा-वडा नाही तर ती एकादशी कसली? तेव्हा आठ/दहा साबुदाणा वडे रिचवले !
मला जर कोणी त्या दिवशी 'उपवास' म्हणजे काय असे विचारले असते तर नेहमी न होणारे पण अगदी खास आवडीचे पदार्थ हवे तेवढे खात राहणे म्हणजे 'उपवास' असा अर्थ मी सांगितला असता !!
आवडीचे पदार्थ किती खावेत याला मर्यादा नसलेला दिवस म्हणजे उपवास.
खरे तर उपवास म्हणजे पचनक्रियेस विश्रांती देण्याचा दिवस; पण उपवासाचा खरा अर्थ आणि त्याप्रमाणे वागणे असे कोठे दिसत नाही. क्रिया होते ती मात्र अगदी वेगळीच ! उपवासाच्या ऐवजी दुप्पट खाशी अशी त्या दिवशी माझी स्थिती होती !!
COMMENTS